logo

पुणे.आळंदी ज्ञानेश्वर विद्यालयातील ८८-८९ दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा गुरुजनांचा कृतज्ञता सोहळा आळंदीत

पुणे.आळंदी
ज्ञानेश्वर विद्यालयातील ८८-८९ दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

गुरुजनांचा कृतज्ञता सोहळा आळंदीत उत्साहात
श्री. ज्ञानेश्वर विद्यालय, आळंदी येथील सन १९८८-८९ च्या दहावीच्या बॅचने एका अविसमरणिय अशा सोहळ्याचे आगळ्यावेगळ्या प्रकारे आयोजन केले होते. निमित्त होते गुरुजन कृतज्ञता सोहळा आणि माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याचे. यात ८९ साली दहावीत शिकलेले १०० विद्यार्थी आणि २५ शिक्षक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नियोजन दोन महिने आधीपासून सुरु होते. सर्वांना निमंत्रण पत्रिका देऊन निमंत्रित केले. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व शिक्षकांना फेटे बांधले, औक्षण केले, गुलाब पाकळ्या टाकून व फुलांच्या पायघड्या करुन स्वागत केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शाळेचे माजी विद्यार्थी जनार्दन सोनावणे यांनी केले. तर प्रास्ताविक प्रा. शिल्पकला रंधवे यांनी केले. सर्व उपस्थित शिक्षकांचा शाल, नारळ, स्मृतिचिन्ह, पुस्तके, ज्ञानेश्वर माऊलींची मुर्ती व गुलाबपुष्प देऊन माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या सन्मानाने शिक्षक अतिशय भारावून गेले होते.
सर्व विद्यार्थी - विद्यार्थीनी दहावीनंतर एकमेकांना तसेच शिक्षकांना तब्बल ३४ वर्षांनी भेटल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आपला परिचय व सध्या काय काम करतात हे सांगितले. अनेक विद्यार्थी शिक्षण क्षेत्रात, वैद्यकीय क्षेत्रात, पोलीस खात्यात, एअरफोर्समध्ये उच्च पदांवर कार्यरत, तसेच काही विविध खाजगी कंपन्यांमध्ये, शेती व विविध उद्योग व्यवसायात प्रगत झाले होते. हे ऐकून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. प्रमोद मंजुळे सर होते.सौ. वृषाली पारखबाई, श्री. हमीद शेख सर, श्री. नानासाहेब साठे सर, श्री. डी. बी. मुंगसे सर, श्री. गोविंद यादव सर, सौ. छाया गायकवाड बाई, श्रीमती. सरला जोशी बाई यांनी मनोगते व्यक्त केली. तसेच इतर सर्व शिक्षकही कार्यक्रमास उपस्थित होते. हा सोहळा दहावीच्या ८९ च्या बॅचच्या तीनही वर्गांनी एकत्रित केल्यामुळे असा सोहळा अविस्मरणीय व ‘न भुतो न भविष्यति’असा साजरा झाल्याच्या भावना आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या.
सर्वांचा गृप फोटो काढून दुपारी सुंदर असे स्नेहभोजन व थंडगार आईस्किमचा आस्वाद घेण्यात आला. मनमुराद गप्पाटप्पा व फोटोसेशन झाल्यावर माजी विद्यार्थ्यांच्या कविता सादरीकरण, गीत गायनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. यामध्ये याज्ञसेनी जोशी, मंदाकिनी केसरी, प्रा. शिल्पकला रंधवे, जनार्दन सोनावणे, डॅा. बाळासाहेब लबडे, मच्छिंद्र सुर्वे, सतिश शेलार, प्रविण थोरात यांनी बहार आणली.
वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी प्रत्येकाने किमान एक पुस्तक आणून जमा झालेली पुस्तके श्री. ज्ञानेश्वर विद्यालयातील ग्रेथालयाला भेट देण्याचे ठरवले.
सदर कार्यक्रमासाठी जनार्दन सोनावणे, प्रा. शिल्पकला रंधवे, राजेंद्र गिलबिले,अनिल मंजुळे,आत्माराम वहीले.पंढरीनाथ चाफळे, अर्जून मेदनकर, संजय कडदेकर, जालिंदर गावडे, शिवाजी भोसले, जीजा शिंदे, कांचन उकिरडे, मनिषा पिंपरकर, शिल्पा शहा, लीला थोरवे, सुधीर कुऱ्हाडे, संतोष ठाकूर या सर्वांनी अतिशय परिश्रम घेऊन यशस्वी केला. कार्यक्रमाचे आभार शंकर जाचक यांनी मानले. यापुढे सर्वजणांनी सामाजिक कार्यातही सहभागी होणार असल्याचे नमुद केले व कार्यक्रम अतिशय नीटनेटका व नियोजन पूर्वक शिस्तबध्द पध्दतीने पार पडला.

108
25084 views